माणिकेश्वर मंदिर परिसर बहरणार; वाघापूर येथे ९०० देशी वृक्षांचे रोपण भार्गवी सोशल फाउंडेशन व आपुलकी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; ४ हजारांहून अधिक वृक्षलागवड व ३ हजारांहून अधिक झाडे यशस्वीपणे जगवण्याचा विक्रम
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
माणिकेश्वर मंदिर परिसर बहरणार; वाघापूर येथे ९०० देशी वृक्षांचे रोपण
भार्गवी सोशल फाउंडेशन व आपुलकी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; ४ हजारांहून अधिक वृक्षलागवड व ३ हजारांहून अधिक झाडे यशस्वीपणे जगवण्याचा विक्रम
वाघापूर (ता. पुरंदर), दि. २६ जुलै : पुरंदर तालुक्यातील उजाड माळरान आणि पाण्याच्या टंचाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या वाघापूर येथील ऐतिहासिक माणिकेश्वर मंदिर परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने भार्गवी सोशल फाउंडेशन आणि आपुलकी फाउंडेशन (वाघापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल ९०० देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वृक्षलागवड न करता ती झाडे जगवण्याचा संकल्प संस्थेने केला असून, उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून झाडांचे संगोपन केले जाणार आहे.
भार्गवी सोशल फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २०२० पासून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड गावचे सुपुत्र असलेले प्रसाद पाटील सध्या पुणे परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असून, वृक्षलागवडीबरोबरच सीडबॉल (Seedballs) निर्मिती, प्लास्टिकमुक्ती अभियान आणि पाणी बचतीबाबत जनजागृती अशा विविध उपक्रमांद्वारे पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभी करत आहेत.
७५ टक्क्यांहून अधिक झाडे जगवण्याचा उल्लेखनीय विक्रम
भार्गवी सोशल फाउंडेशनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ झाडे लावून न थांबता त्यांचे वर्षभर संगोपन करणे. गेल्या वर्षी लावलेल्या ७०० झाडांपैकी तब्बल ६०० झाडे आजही जिवंत असून, ७५ टक्क्यांहून अधिक झाडे यशस्वीपणे जगवण्याचा विक्रम संस्थेने कायम ठेवला आहे.
यावर्षी वाघापूर येथील माळरानावर ९०० नवीन देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आजपर्यंत रामधारा, सासवड, वाघापूर आणि थेऊर परिसरात ४,००० वृक्षांची लागवड पूर्ण झाली असून त्यापैकी ३,००० हून अधिक झाडे यशस्वीपणे जगवून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.
ग्रामस्थ, शिक्षक आणि दानशूर व्यक्तींचे मोलाचे सहकार्य
या पर्यावरण मोहिमेत अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक स्वरूपात योगदान दिले. तसेच वाघापूर येथील ग्रामस्थ, शिक्षक वृंद आणि श्रीकांत कुंजीर यांनी उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. संस्थापक प्रसाद पाटील आणि नम्रता पाटील यांनी सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी सौ. यशश्री भालेराव (क्षेत्रीय अधिकारी, पुरंदर तालुका सामाजिक वनीकरण विभाग), मिलिंद पाटील (दीपस्तंभ फाउंडेशन), सरपंच दिपाली कुंजीर आणि वसंतभाऊ कुंजीर (सचिव, आपुलकी फाउंडेशन) यांची प्रमुख उपस्थिती होती.
अनेक स्वयंसेवकांचे श्रमदान

या मोहिमेत भार्गवी सोशल फाउंडेशनचे मुख्य शिलेदार राहुल मारशेट्टी, आशिष पडवळे व परिवार, मिथुन महाले, सचिन पाचपिंडे, हरी साळवे, आकाश घैवानकर, संजय सपकाळ, सोहम व परिवार, नारायण मोरे, रणजीत शिंदे, पत्रकार सोमनाथ खंडागळे, तुकाराम कांबळे, सुरज इजारे,
निखिल इंदलकर ,हेमंत कडलक ,गोडसे सर
लहान मित्र परिवारातील अन्वित, आकांक्षा, गौरिका, शौर्य, युवानेते हर्षवर्धन पाटील, सचिन कुंजीर, संदीप कुंजीर तसेच आपुलकी फाउंडेशनचे सचिव वसंतभाऊ कुंजीर, त्यांची संपूर्ण टीम आणि मित्र परिवाराने प्रत्यक्ष मैदानावर उतरून श्रमदान केले.
लोकसहभागाचे आवाहन
“पर्यावरण समृद्ध करणे ही एक लोकचळवळ झाली पाहिजे. वृक्षलागवडीसोबतच प्लास्टिक बंदी, सीडबॉल निर्मिती आणि पाणी बचतीचे उपक्रम आम्ही अधिक व्यापक करत आहोत. भविष्यात अशा पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी समाजाकडून अधिक पाठबळ आणि आर्थिक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा आहे,” असे आवाहन भार्गवी सोशल फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद पाटील यांनी केले.
संपर्क :
प्रसाद पाटील (संस्थापक, भार्गवी सोशल फाउंडेशन)
📞 ९०९१५ ९०३३३
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





