नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , 31 जुलैला थेऊरमध्ये ‘महासमाधान शिबिर’; 18 शासकीय विभाग एकाच छताखाली – जन समाचार लाइव 24

31 जुलैला थेऊरमध्ये ‘महासमाधान शिबिर’; 18 शासकीय विभाग एकाच छताखाली

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोर, दि. 29 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत शुक्रवार, दि. 31 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता आशिर्वाद बॅन्क्वेट हॉल, थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) येथे भव्य ‘समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अपर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, लोणी काळभोर यांनी संबंधित विभागांना सविस्तर सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समाधान शिबिर आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनाचे औचित्य, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त तसेच महसूल दिनानिमित्त हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने अपर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, लोणी काळभोर यांनी 28 जुलै 2026 रोजी संबंधित विभागांना पत्र पाठवून शिबिरासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिबिरामध्ये महसूल विभागासह संजय गांधी निराधार योजना, पंचायत समिती, पोलीस विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), महिला व बालविकास विभाग, भूमी अभिलेख, नोंदणी व मुद्रांक विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, महावितरण तसेच वाहतूक विभाग आदी विविध शासकीय विभाग सहभागी होणार आहेत.

प्रत्येक विभागाने आपल्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लाभार्थ्यांची यादी तयार करणे, विविध योजनांचे बॅनर, माहितीपत्रके, जनजागृती साहित्य उपलब्ध करून देणे तसेच संबंधित लाभार्थींना शिबिरात उपस्थित राहण्यासाठी नियोजन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी किमान एक तास अगोदर उपस्थित राहून स्टॉल उभारणी व नियोजन पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या समाधान शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, महसूल व इतर विभागांशी संबंधित समस्या, अर्ज, प्रमाणपत्रे, लाभ योजनांबाबत मार्गदर्शन तसेच विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, लोणी काळभोर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31