नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शिवराज ज्ञानोबा साने यांना ‘गुणगौरव कलारत्न पुरस्कार २०२६’ प्रदान – जन समाचार लाइव 24

शिवराज ज्ञानोबा साने यांना ‘गुणगौरव कलारत्न पुरस्कार २०२६’ प्रदान

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शिवराज ज्ञानोबा साने यांना ‘गुणगौरव कलारत्न पुरस्कार २०२६’ प्रदान

३५ वर्षांच्या सांगीतिक प्रवासाचा गौरव; राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान

वाई, सातारा | प्रतिनिधी | सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६

वाई तालुक्यातील कोचळेवाडी येथे रविवारी, दि. २५ ऑक्टोबर रोजी विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात शिवराज ज्ञानोबा साने यांना ‘गुणगौरव कलारत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. कलाक्षेत्रातील सुमारे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री सौ. प्रियांका शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर पडाळे, कार्यक्रमाचे आयोजक तथा विद्यानिकेतन संस्थेचे शशिकांत एकनाथ कोचळे सर, पत्रकार तथा संपादक सुनील रासकर, सम्राट बौद्ध जनजागृती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखा साने यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

शिवराज ज्ञानोबा साने हे मूळचे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील काटे जळगाव येथील रहिवासी असून, सध्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे वास्तव्यास आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते कलाक्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या सांगीतिक योगदानाची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या राज्यस्तरीय सोहळ्यात सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

शिवराज ज्ञानोबा साने यांना ‘गुणगौरव कलारत्न पुरस्कार २०२६’ मिळाल्याबद्दल हवेली तालुक्यासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या सन्मानामुळे त्यांच्या ३५ वर्षांच्या कलासाधनेचा गौरव झाला असून, त्यांच्या पुढील सांगीतिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031