नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतात: ग्रामस्थांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान. – जन समाचार लाइव 24

थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतात: ग्रामस्थांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतात: ग्रामस्थांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र थेऊरच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या महर्षी कौंडिण्यऋषी (कपिल ऋषी) आश्रम परिसरात स्वच्छता व जीर्णोद्धार अभियान राबविण्यात आले. काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या या पवित्र स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली होती.

त्यामुळे भाविकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन थेऊरमधील गणेशभक्त आणि ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून परिसराची स्वच्छता केली.

पुराणपरंपरेत स्थावर क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र थेऊरला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री चिंतामणी गणपती बाप्पांचा जन्म, नामकरण आणि गणेशलीलांचा उल्लेख ‘चिंतामणी विजय’ ग्रंथात असल्याचे सांगितले जाते. याच धार्मिक परंपरेचा आणि पावित्र्याचा वारसा लाभलेल्या थेऊरला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही संबोधले जाते. महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम हे या पवित्र भूमीतील महत्त्वाचे आध्यात्मिक स्थान मानले जाते.


या आश्रमाच्या माध्यमातून थेऊरच्या धार्मिक परंपरेचा आणि प्राचीन सांस्कृतिक वारसा याचा परिचय होतो. या उपक्रमामुळे आश्रमाकडे जाणारा मार्ग अधिक सुकर झाला असून, भाविकांना या पवित्र स्थळाला भेट देणे सोयीचे होणार आहे. श्रमदानादरम्यान उपस्थित भाविकांनी या परिसरातील आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. धार्मिक वारसा संवर्धनाची अपेक्षा श्रीक्षेत्र थेऊरला भेट देणाऱ्या प्रत्येक गणेशभक्ताला येथील प्राचीन धार्मिक स्थळांची माहिती व्हावी, तसेच महर्षी कौंडिण्यऋषी आश्रमाचे महत्त्व व्यापक स्तरावर पोहोचावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. केवळ स्वच्छता करून थांबण्याऐवजी आश्रम परिसराचे नियमित संवर्धन, आवश्यक दुरुस्ती आणि ऐतिहासिक वारसा याचे जतन करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न होण्याची गरज आहे.


थेऊरला प्राचीनकाळी ऋषिमुनी व अनेक देवदेवतांचा अधिवास राहिला असल्याने, धार्मिक वैभवात महत्त्वाचे स्थान आहे. थेऊर येथे असलेल्या सर्व धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी मागणी गणेशभक्त व ग्रामस्थांकडून होत आहे. थेऊर येथील युवा गणेश भक्तांनी स्वयंस्फूर्तपणे सुरू केलेला हा उपक्रम थेऊरच्या पुरातन धार्मिक वारसा जतनासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031