नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , PMPML ची ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवा सुरू; महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या हस्ते उद्घाटन – जन समाचार लाइव 24

PMPML ची ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवा सुरू; महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या हस्ते उद्घाटन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 PMPML ची ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवा सुरू; महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. ४ ऑगस्ट : पावसाळ्यातील निसर्गरम्य पर्यटनाला चालना देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) तर्फे सुरू करण्यात आलेल्या मार्ग क्र. ९ (अ) ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवेचे उद्घाटन मंगळवारी स्वारगेट बसस्थानक येथे पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी PMPML चे संचालक अजय खेडेकर प्रमुख उपस्थित होते.

या विशेष पर्यटन बस सेवेच्या माध्यमातून पर्यटकांना पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर अनुभव घेता यावा, यासाठी मुळशी धरण, पळसे धबधबा आणि नयनरम्य सेल्फी पॉईंट अशा आकर्षक पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पुणेकरांना एका दिवसात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

उद्घाटनप्रसंगी महापौर मंजुषाताई नागपुरे म्हणाल्या, “PMPML चा हा उपक्रम पुणेकरांसाठी तसेच पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त असून, पावसाळी पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल. सुरक्षित, नियोजनबद्ध आणि परवडणाऱ्या दरात पर्यटनाची संधी उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.” तसेच, पुणे महानगरपालिकेच्या सर्व महिला नगरसेविकांसाठीही या विशेष पर्यटन बस सेवेअंतर्गत स्वतंत्र सहलीचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

PMPML चे संचालक अजय खेडेकर यांनी पर्यटन बस सेवेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी भविष्यात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा आणखी विशेष बस सेवा सुरू करण्याचा मानसही व्यक्त केला.

या कार्यक्रमास वाहतूक व्यवस्थापक यशवंत हिंगे, जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड तसेच PMPML चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाळ्यातील हिरवाई, धबधबे आणि निसर्गरम्य वातावरणाचा सुरक्षित व संस्मरणीय अनुभव घेण्यासाठी पुणेकरांनी PMPML च्या ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31