नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , रक्षाबंधननिमित्त पीएमपीएमएलच्या १९४५ बसेस पूर्ण क्षमतेने मार्गावर – जन समाचार लाइव 24

रक्षाबंधननिमित्त पीएमपीएमएलच्या १९४५ बसेस पूर्ण क्षमतेने मार्गावर

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

रक्षाबंधननिमित्त पीएमपीएमएलच्या १९४५ बसेस पूर्ण क्षमतेने मार्गावर

पुणे, दि. २६ ऑगस्ट २०२६ : रक्षाबंधन सणानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड, उपनगरे तसेच पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) विशेष वाहतूक नियोजन केले आहे. शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून, सलग तीन दिवस म्हणजेच २८, २९ आणि ३० ऑगस्ट रोजी पीएमपीएमएलच्या ताफ्यातील तब्बल १ हजार ९४५ बसेस पूर्ण क्षमतेने मार्गावर धावणार आहेत.

रक्षाबंधनाच्या दिवशी दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि जास्तीत जास्त बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पीएमपीएमएलने हे नियोजन केले आहे.

वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी चालक, वाहक तसेच पर्यवेक्षकीय सेवकांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गर्दीच्या आणि महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रवाशांना वेळेत आणि सुरळीत बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

प्रवाशांनी बससेवेचा लाभ घ्यावा

रक्षाबंधनानिमित्त २८ ते ३० ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या बससेवेची प्रवाशांनी नोंद घ्यावी आणि पीएमपीएमएलच्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31