दहिहंडीनिमित्त पीएमपीएमएलच्या बसमार्गांत तात्पुरते बदल; प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
दहिहंडीनिमित्त पीएमपीएमएलच्या बसमार्गांत तात्पुरते बदल; प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन
पुणे, दि. २ सप्टेंबर : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत होणारे बदल लक्षात घेऊन पीएमपीएमएलकडून काही बसमार्गांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहेत.
शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दहिहंडी उत्सवानिमित्त काही रस्ते बंद राहणार असल्याने संबंधित बसमार्गांचे संचलन पर्यायी मार्गांवरून करण्यात येणार आहे.
बसमार्गांतील प्रमुख बदल असे —
१) बसमार्ग क्र. १७ नन्हेगाव ते शिवाजीनगर तसेच बसमार्ग क्र. ५० शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गावरील बसेस रस्ता बंद झाल्यानंतर सारसबाग बसस्थानकापर्यंत संचलनात राहतील.
२) बसमार्ग क्र. ११३ अ.ब. चौक ते सांगवी या मार्गावरील बसेस रस्ता बंद झाल्यानंतर म.न.पा. भवन नदीकाठी बसस्थानकावरून संचलनात राहतील.
३) बसमार्ग क्र. ८, ९, ५७, ५७य, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४अ, १४४क आणि २८३ या मार्गावरील बसेस रस्ता बंद झाल्यानंतर ये-जा करताना डेक्कन जिमखाना, म.न.पा. भवन व गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने संचलनात राहतील.
४) दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारपाळीमध्ये तसेच दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी रस्ता बंद झाल्यानंतर बसमार्ग क्र. १७४ वरील बसेस गाडीतळ (जुना बाजार), म.न.पा. व डेक्कन मार्गे पुढे पूर्ववत मार्गाने संचलनात राहतील.
५) बसमार्ग क्र. २, २अ, ११, ११अ, ११क, १३, २१, ३०, ३७, ३८, २१६, २९७, २९८, ३५४ आणि रातराणी-१ या मार्गावरील बसेस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन व टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. मात्र, स्वारगेटकडून शिवाजीनगरकडे जाताना या बसेस बाजीराव रोडने संचलनात राहतील.
६) बसमार्ग क्र. ७ व २०२ वरील बसेस दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यानंतर ते दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत, रस्ता बंद झाल्यानंतर ये-जा करताना स्वारगेट व टिळक रोड मार्गे संचलनात राहतील.
७) बसमार्ग क्र. ६८ वरील बसेस रस्ता बंद झाल्यानंतर ये-जा करताना स्वारगेट व टिळक रोड मार्गे संचलनात राहतील.
८) स्वारगेट आगाराकडून संचलित होणारे बसमार्ग क्र. ३ आणि ६ हे दोन्ही बसमार्ग शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत.
दहिहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या तात्पुरत्या बदलांची नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नोंद घ्यावी व पीएमपीएमएल प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





