तीन मोक्का गुन्ह्यांतील फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखेकडून शिताफीने अटक
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
तीन मोक्का गुन्ह्यांतील फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखेकडून शिताफीने अटक
पुणे, प्रतिनिधी : गंभीर स्वरूपाच्या व मोक्का अंतर्गत नोंद असलेल्या तीन गुन्ह्यांतील फरार आरोपीस पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ३ पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. अभिजित उत्तम गोरडे (वय ३३, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, अशिष गार्डनजवळ, कोथरूड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती , मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री. तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. यांनी गंभीर व मोक्का गुन्ह्यांतील फरार आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पथकातील पोलीस अंमलदार आरोपींचा शोध घेत होते. यावेळी पोलीस अंमलदार संदीप शेळके व नितीन जगदाळे यांना गोपनीय माहितीदारामार्फत अभिजित गोरडे हा रात्रीच्या वेळी आपल्या राहत्या घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
माहिती मिळताच वरिष्ठांच्या सूचनेनुसार संत ज्ञानेश्वर कॉलनी, अशिष गार्डनजवळ, कोथरूड परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी घराला चारही बाजूंनी घेराव घालत आरोपीला कोणतीही पळून जाण्याची संधी न देता मध्यरात्री ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीचा कोथरूड परिसरातील दोन तसेच वारजे परिसरातील एका गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध अंतर्गत कोथरूड पोलीस ठाण्यात गु.र.क्र. २७७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि मोक्का अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत.
पुढील कारवाईसाठी आरोपीला सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वीनी सातपुते, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री. गौहर हसन व मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे तसेच पोलीस अंमलदार शेळके, जगदाळे, बोडरे, तुपसौंदर, साठे, काटकर आणि वागस्कर यांनी पार पाडली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





