नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुणे महानगर परिवहन महामंडळात मोफत योग व हास्ययोग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद – जन समाचार लाइव 24

पुणे महानगर परिवहन महामंडळात मोफत योग व हास्ययोग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे महानगर परिवहन महामंडळात मोफत योग व हास्ययोग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, प्रतिनिधी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट मुख्यालय येथे बुधवार, दि. ३ जून २०२६ रोजी नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे यांच्या सहकार्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय मोफत योग व हास्ययोग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार सरनाईक, मुख्य अभियंता राजेश कुदळे, प्रशासन अधिकारी संतोष किरवे तसेच नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मकरंद टिल्लू यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे तसेच हास्ययोगाच्या माध्यमातून तणावमुक्त जीवनशैली कशी अंगीकारता येते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.

तसेच अशा आरोग्यवर्धक उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होत असल्याचे नमूद करण्यात आले. शिबिरादरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि हास्ययोगाच्या प्रात्यक्षिकांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड यांनी केले. या उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930