नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सुप्रसिद्ध अभिनेते सतीश राजवाडे यांच्याकडून संगीतकार शिवराज साने यांचा सत्कार – जन समाचार लाइव 24

सुप्रसिद्ध अभिनेते सतीश राजवाडे यांच्याकडून संगीतकार शिवराज साने यांचा सत्कार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

सुप्रसिद्ध अभिनेते सतीश राजवाडे यांच्याकडून संगीतकार शिवराज साने यांचा सत्कार

उरुळी कांचन, दि. ६ जून २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सतीश राजवाडे यांनी उरुळी कांचन येथील ज्येष्ठ संगीतकार व सामाजिक कार्यकर्ते शिवराज साने यांचा वाढदिवसानिमित्त तसेच पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

शिवराज साने यांनी महाराष्ट्रभर संगीतकला क्षेत्रात तसेच सामाजिक जनजागृती करणाऱ्या पथनाट्यांमधून गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य केले आहे. या काळात त्यांनी अभिनेते सतीश राजवाडे यांच्यासोबत विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला आहे.

अभिनय क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही मोलाचे योगदान देणारे सतीश राजवाडे यांनी हा स्पर्श मायेचा, स्वर्गावर स्वारी तसेच प्रसिद्ध महानाट्य जाणता राजा यांसारख्या नाटकांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाची छाप उमटवली आहे. समाजभूषण पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार यांसारख्या विविध सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

अशा मान्यवर व्यक्तिमत्त्वाकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि सन्मान मिळणे हा शिवराज साने यांच्या कार्याचा गौरव असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी सम्राट बहुउद्देशीय जनजागृती संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखा शिवराज साने, उरुळी कांचन, कुंजीरवाडी व लोणी काळभोर येथील संगीत क्लासेसचे विद्यार्थी, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच पत्रकार बंधू-भगिनी यांनी उपस्थित राहून शिवराज साने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आनंदी वातावरणात त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930