नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊर, नायगाव व हिंगणगाव कृषी फिडरवरील गावांना, पुन्हा दिवसा वीजपुरवठा सुरू करा- सभापती काकडे. – जन समाचार लाइव 24

थेऊर, नायगाव व हिंगणगाव कृषी फिडरवरील गावांना, पुन्हा दिवसा वीजपुरवठा सुरू करा- सभापती काकडे.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊर, नायगाव व हिंगणगाव कृषी फिडरवरील गावांना, पुन्हा दिवसा वीजपुरवठा सुरू करा- सभापती काकडे.

हवेली तालुक्यातील थेऊर, नायगाव, व हिंगणगाव (AG) कृषी फिडर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना पूर्वीप्रमाणेच दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैकर व आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या या फिडरअंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा करण्यात येत असल्याने सिंचनासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. रात्री शेतात जाऊन मोटारी सुरू करणे, पाणी व्यवस्थापन करणे यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढल्याने हल्ल्याची भीती बदली आहे. तसेच अन्य अनेक समस्यांना शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी या भागातील गावांना दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे आणि सिंचनाचे नियोजन सुलभपणे करता येत होते. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने दिवसा वीजपुरवठा होणे अत्यंत आवश्यक असल्याचेही काकडे यांनी म्हटले आहे.
थेऊर, नायगाव व हिंगणगाव AG फिडर अखत्यारीतील सर्व गावांना पूर्वीप्रमाणे दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी, महावितरण प्रशासनाने तातडीने आवश्यकती कार्यवाही करावी, अशी मागणी सभापती युवराज काकडे यांनी केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031