नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , यवत परिसरात जमीन बळकावण्याच्या प्रयत्नातून रायकर-जाधव कुटुंबीयांवर हल्ला – जन समाचार लाइव 24

यवत परिसरात जमीन बळकावण्याच्या प्रयत्नातून रायकर-जाधव कुटुंबीयांवर हल्ला

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

यवत परिसरात जमीन बळकावण्याच्या प्रयत्नातून रायकर-जाधव कुटुंबीयांवर हल्ला

एसपींकडे तक्रार; तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश

: यवत पोलीस स्टेशन हद्दीत जमिनीच्या वादातून रायकर व जाधव कुटुंबीयांना जबरी मारहाण करून त्यांच्या मालकीची जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित प्रकरणी पीडित कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देत न्यायाची मागणी केली आहे.

सुभाष रायकर (रा. इंदिरानगर, यवत) आणि कृष्णा बाबू जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या मालकीची सुमारे ७६ गुंठे जमीन असून संबंधित व्यक्ती बेकायदेशीररित्या त्या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी संबंधित व्यक्तीने सुमारे २० बाऊन्सर तसेच महिला व पुरुषांना सोबत घेऊन त्यांच्या जागेवर प्रवेश केला. घरात घुसून दमदाटी करत मारहाण करण्यात आली तसेच महिलांनाही शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावेळी सुभाष रायकर व कृष्णा जाधव यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जातिवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर आरोपही पीडितांनी केला आहे.

घटनेनंतर ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, पोलिसांनी संबंधित बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या व्यक्तीची बाजू घेतल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. तसेच यवत पोलीस स्टेशनमधून आम्हाला हाकलून लावण्यात आले व आमच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, असेही त्यांनी माध्यमांसमोर सांगितले.

यानंतर पीडित कुटुंबीयांनी थेट पोलीस अधीक्षक (एसपी) यांच्याकडे धाव घेत तक्रार अर्ज सादर केला. संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर एसपी यांनी यवत पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

या वेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये अमित आदमाने (सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत), संगीता ताई वानखेडे (सामाजिक कार्यकर्त्या, दौंड तालुका), नानासाहेब अवचिते (संस्थापक अध्यक्ष, ज्यागवार ग्रुप ऑल इंडिया), सनी भाऊ डाडर (संस्थापक अध्यक्ष, लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य), सोमनाथ गावडे (सामाजिक कार्यकर्ते, लोणी काळभोर), संतोष खोमणे (सामाजिक कार्यकर्ते, हडपसर), साबळे ताई (आरपीआय अध्यक्ष, हडपसर), अॅड. डोंगरे, अॅड. बोरसे, पत्रकार लांडगे ताई, संगम सिंग टाक (इंडियन क्राईम न्यूज प्रभारी) तसेच स्त्री शक्ती संस्थेच्या अध्यक्षा संगीता ताई वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930