नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , गांजाच्या मुळावर घाव; लागवड करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई – जन समाचार लाइव 24

गांजाच्या मुळावर घाव; लागवड करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

गांजाच्या मुळावर घाव; लागवड करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई

पुणे, दि. २८ एप्रिल – लोहगाव परिसरात गांजाची लागवड करून त्याची विक्री करणाऱ्या इसमावर लोहगाव पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोहगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार आकाश मोरे व अमोल आदलिंग यांना गोपनीय माहितीच्या आधारे पठारे वस्ती, लोहगाव येथे एक इसम गांजाची लागवड करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पाटील यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने २७ एप्रिल २०२६ रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यामध्ये आरोपी हर्ष भरतकुमार पांचाल (वय ३०) हा भाड्याने घेतलेल्या बंगल्याच्या गार्डनमध्ये गांजाची लागवड करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून लहान-मोठी ४१ गांजाची झाडे जप्त केली असून त्यांचे एकूण वजन ४.३२८ किलो आहे. तसेच आरोपीच्या हुंडाई कंपनीच्या चारचाकी वाहनातून ०.०६६ किलो गांजा आणि ९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या कारवाईत एकूण ₹६,०७,३८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हर्ष पांचाल (रा. नमो पॅराडाईज, लोहगाव, पुणे; मूळ अहमदाबाद, गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परि-७ सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग नूतन पवार यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी मगदुम, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तसेच गणेश इथापे, अमोल आदलिंग, गणेश सातपुते, बाळासाहेब शिरसाठ, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, आश्विन देठे, ज्ञानदेव आवारी, अल्पेश पोटकुले, प्रितम जंगम, सचिन जाधव, आकाश मोरे, ज्ञानेश्वर आवारी, युवराज चौधरी, अशोक थोरात आदींचा समावेश होता.
लोहगाव परिसरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930