हवेली पंचायत समितीच्या, पूर्व भागातील विविध विकासकामांचे, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याहस्ते रविवारी भूमिपूजन.!
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
हवेली पंचायत समितीच्या, पूर्व भागातील विविध विकासकामांचे, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याहस्ते रविवारी भूमिपूजन.!
हवेली पंचायत समितीच्या वतीने, तालुक्यातील विविध विकासकामांना निधी मंजूर झाला असून, या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या शुभहस्ते होणार असल्याचे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी सांगितले.
हवेली तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रस्ते, पायाभूत सुविधा, ग्रामविकास तसेच विविध लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. मंजूर झालेल्या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होऊन गावांच्या विकासाला गती मिळणार आहे.
भूमिपूजन समारंभास आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासह सभापती, उपसभापती, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत कामांची भूमिपूजने पार पडणार आहेत.
हवेली तालुक्यातील विकासकामांना मिळालेल्या या निधीबद्दल नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पुढील काही दिवसात टप्पा 2 च्या माध्यमातून अजून काही विकासकामांना मंजुरी देणार असल्याचे सभापती युवराज काकडे व उपसभापती विद्या गायकवाड यांनी सांगितले. तसेच हवेली तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





