नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , घोरपडेवस्तीत तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा; लोणीकाळभोर पोलिसांची धडक कारवाई – जन समाचार लाइव 24

घोरपडेवस्तीत तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा; लोणीकाळभोर पोलिसांची धडक कारवाई

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

घोरपडेवस्तीत तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा; लोणीकाळभोर पोलिसांची धडक कारवाई

लोणीकाळभोर | प्रतिनिधी

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवून ठेवलेला तब्बल १ लाख ९१ हजार १८० रुपयांचा विमल पान मसाला, तंबाखू, जर्दा व सुगंधित तंबाखूचा साठा लोणीकाळभोर पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

विकास किसन उतपुरे (वय २३, रा. घोरपडेवस्ती, लेन नं. ३, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१० वाजता घोरपडेवस्ती येथील आरोपीच्या राहत्या घरात ही कारवाई करण्यात आली. शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून सुमारे १.९१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील विविध कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणाची फिर्याद पोलीस शिपाई सचिन भिमराव सोनवणे यांनी दिली आहे. आरोपीला १५ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तैबुद्दीन मुंडे करीत आहेत.

प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर पोलिसांची नजर

लोणीकाळभोर परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा पदार्थांचा अवैध साठा व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31