साष्टे जि.प. शाळेत सुवर्णप्राशन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
साष्टे जि.प. शाळेत सुवर्णप्राशन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
साष्टे, दि. ११ ऑगस्ट २०२६ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साष्टे येथे डॉ. स्नेहा छपरे व डॉ. निकिता रिकामे यांच्या वतीने सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १०० बालकांनी सुवर्णप्राशनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संगीता राजकुमार रिकामे यांनी केले. यावेळी त्यांनी भारतातील आयुर्वेदाचे महत्त्व तसेच जगभरात आयुर्वेदाचा होत असलेला प्रसार याबाबत माहिती दिली.
शिबिरामध्ये भारतातील आयुर्वेद, सुवर्णप्राशन संस्कार, अग्निकर्म व विद्याकर्म, आधुनिक काळातील जंक फूड तसेच जंक फूडचे आरोग्यावर होणारे परिणाम या विषयांवर डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. उपस्थित बालकांना सुवर्णप्राशनाचा लाभ देण्यात आला, तसेच विद्याकर्माचाही लाभ अनेकांनी घेतला.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शाळेत आगामी काळात विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून वाचनालयही सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकांना दिली.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सौ. निशाताई भोर, जिल्हा परिषद शाळा साष्टे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. अविनाश रिकामे, माता पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. प्रा. राजकुमार रिकामे यांनी केले. आपण या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शाळेच्या विकासासाठी आपल्याकडून जेवढे योगदान देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न करू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शाळेच्या वतीने तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल डॉ. स्नेहा छपरे, डॉ. निकिता रिकामे, डॉ. प्रा. राजकुमार रिकामे व सौ. संगीता राजकुमार रिकामे यांचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर यांनी मनःपूर्वक आभार मानले
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





