निमसाखर येथील ‘पुणे मॉडेल स्कूल’ची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
निमसाखर येथील ‘पुणे मॉडेल स्कूल’ची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी
इंदापूर | प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील विविध विकासकामांची पाहणी केली.
पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ या अभिनव उपक्रमांतर्गत निमसाखर येथील शाळेत सुरू असलेल्या विविध विकासकामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शाळेतील शैक्षणिक सुविधा, भौतिक सोयी-सुविधा तसेच सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शाळेचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येत असल्याचे यावेळी दिसून आले. सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, माधुरी भिसे, सोनाली जाधव, पंचायत समिती सदस्य ज्योत्सना सुरुडकर, हर्षवर्धन लोंढे, जयकुमार कारंडे, बाबुराव शेंडे, विमल काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक सुविधा निर्माण होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक चांगले वातावरण उपलब्ध होण्यास मदत होत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





