लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या सायबर सेलची उल्लेखनीय कामगिरी; CEIR पोर्टलच्या मदतीने हरविलेले १० मोबाईल मालकांना परत
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या सायबर सेलची उल्लेखनीय कामगिरी; CEIR पोर्टलच्या मदतीने हरविलेले १० मोबाईल मालकांना परत
लोणी काळभोर, प्रतिनिधी : भारत सरकारच्या Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करून लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या सायबर सेलने हरविलेले १० मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे ₹३ लाख ४० हजार इतकी आहे.
हरविलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल फोन त्यांच्या IMEI क्रमांकाच्या आधारे शोधण्यासाठी CEIR पोर्टल प्रभावी ठरत असून, या माध्यमातून नागरिकांना त्यांचे मोबाईल पुन्हा मिळवून देण्यात मोठे यश मिळत आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी CEIR पोर्टलवर नोंदविलेल्या तक्रारींचे सायबर सेलने तांत्रिक विश्लेषण केले. संबंधित मोबाईल फोनच्या IMEI क्रमांकाचा मागोवा घेत विविध जिल्हे तसेच इतर राज्यांतील पोलीस यंत्रणांशी समन्वय साधून सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांतून हरविलेले १० मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण करत संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ तक्रारदारांच्या ताब्यात दिले. या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या लोणी काळभोर पोलिसांच्या बांधिलकीचा पुन्हा प्रत्यय आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६ श्री. जीवन बेनिवाल तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. नंदकुमार कोळी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा बाबर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार योगेश पाटील, महिला पोलीस अंमलदार उषा थोरात आणि महिला पोलीस अंमलदार कौशल्या शिंदे यांनी परिश्रम घेऊन ही यशस्वी कारवाई केली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





