नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , संत तुकाराम महाराज परतीच्या पालखीचा मुक्काम कुंजीरवाडीत ; हवेली सभापतींकडून पालखीतळाची पाहणी. – जन समाचार लाइव 24

संत तुकाराम महाराज परतीच्या पालखीचा मुक्काम कुंजीरवाडीत ; हवेली सभापतींकडून पालखीतळाची पाहणी.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

संत तुकाराम महाराज परतीच्या पालखीचा मुक्काम कुंजीरवाडीत ; हवेली सभापतींकडून पालखीतळाची पाहणी.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या, परतीच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम, आज सायंकाळी मौजे कुंजीरवाडी, ता. हवेली येथे असणार आहे. येथील पालखीतळ व पालखी मुक्कामी असणाऱ्या विठ्ठल मंदिरातील व्यवस्थेची, आज सकाळी पाहणी केली. भाविक भक्तांना शासनाकडून उपलब्ध केल्या जाणाऱ्या सर्व सोई-सुविधांचा आढावा घेतला. अंदाजे 2 ते 3 हजार वारकरी बांधव परतीच्या पालखीला, कुंजीरवाडी येथे मुक्कामी असतात. या सर्व वारकरी बांधवांना तसेच यावेळी दर्शनासाठी पंचक्रोशीतील येणाऱ्या 6 ते 7 हजार भाविकभक्तांना ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.
आज पूर्व तयारीच्या पाहणी वेळी, ग्रामस्थांनी मंडप व इतर व्यवस्थेसाठी अद्याप पर्यंत शासनाकडून कोणतेही अनुदान उपलब्ध न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. येथील मंडप व इतर व्यवस्था ही, ग्रामस्थांनी स्वखर्चाने लोकवर्गणीतून केल्याचे सांगितले. याप्रसंगी मोठ्याप्रमाणत ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच येणाऱ्या वारकरी बांधवांना कुंजीरवाडीसह परिसरातील नागरिकांकडून घरच्या भाकरीची व्यवस्था केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी, शासनाकडून पालखी पंढरपूरला जातेवेळी सर्वच मुक्कामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोईसुविधा उपलब्ध केल्या जातात, तसेच पालखीतळ अथवा मुक्काम परिसर सुधारण्यासाठी गावांना मोठ्या-प्रमाणात अनुदान व निधी उपलब्ध केला जातो, त्याच धर्तीवर कुंजीरवाडीसह इतर सर्वच परतीच्या पालखी मुक्काम स्थळांच्या सुधारणेसाठी, जिल्हा परिषद व शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी सांगितले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31