नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातही अरुण पवार यांचा माणुसकीचा झरा; मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर परतीच्या प्रवासातही वारकऱ्यांच्या सेवेत टँकर सोबत – जन समाचार लाइव 24

पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातही अरुण पवार यांचा माणुसकीचा झरा; मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर परतीच्या प्रवासातही वारकऱ्यांच्या सेवेत टँकर सोबत

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातही अरुण पवार यांचा माणुसकीचा झरा; मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर

परतीच्या प्रवासातही वारकऱ्यांच्या सेवेत टँकर सोबत

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातही वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी वृक्षमित्र अरुण पवार यांनी मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर पालखी सोहळ्यासोबत ठेवले आहेत. पंढरपूर ते आळंदी या संपूर्ण पालखी मार्गावर त्यांच्यावतीने मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या या पालखी सोहळ्यात ऊन-पावसाची तमा न बाळगता लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरकडे जातात. या काळात पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होते. हीच गरज ओळखून अरुण पवार हे गेल्या बारा वर्षांपासून पालखी सोहळ्यासोबत मोफत पिण्याच्या शुद्ध पाण्याचे टँकर पाठवत आले आहेत. यंदाही पालखी सोहळ्यात अरुण पवार यांनी पाण्याचे सात टँकर पाठवले आहेत. विशेष म्हणजे पालखीच्या परतीच्या प्रवासातही हे पाण्याचे टँकर पालखी सोहळ्यासोबतच आहेत. त्यामुळे परतीच्या वाटेवरही वारकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही. अरुण पवार यांच्या या उपक्रमाचे वारकरी संप्रदायातून आणि सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना अरुण पवार म्हणाले, की वारकऱ्यांची सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा आहे. माऊली व तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात खारीचा वाटा उचलता आला याचे समाधान आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी कोणत्याही वारकऱ्याचे हाल होऊ नयेत, हाच यामागचा उद्देश आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31