पुणे जिल्हा तालुका पंचायत समिती सभापती असोसिएशनच्या ‘अध्यक्षपदी’ काळे ‘उपाध्यक्षपदी’ काकडे तर ‘सचिवपदी’ तावरे यांची निवड.
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पुणे जिल्हा तालुका पंचायत समिती सभापती असोसिएशनच्या ‘अध्यक्षपदी’ काळे ‘उपाध्यक्षपदी’ काकडे तर ‘सचिवपदी’ तावरे यांची निवड.
पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील तालुका पंचायत समिती सभापतींची बैठक, पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीमध्ये तालुका पंचायत समितींच्या विविध समस्या, अधिकार व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व तालुका पंचायत समिती सभापतींनी सर्वानुमते आंबेगाव पंचायत समितीचे ज्येष्ठ सभापती श्री. कैलास बुवा काळे यांची, पुणे जिल्हा तालुका पंचायत समिती सभापती असोसिएशनच्या ‘अध्यक्षपदी’ तर हवेली पंचायत समितीचे सभापती श्री. युवराज हिरामण काकडे यांची ‘उपाध्यक्षपदी’ तसेच बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांची ‘सचिवपदी’ निवड करण्यात आली.
या निवडीनंतर संघटनेच्या वतीने, सर्व तालुका पंचायत समिती सभापतींच्या विविध मागण्यांचे निवेदन, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे यांच्या दालनात देण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांचीही भेट घेऊन विविध मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास काळे, उपाध्यक्ष युवराज काकडे व सचिव किरण तावरे यांनी ‘पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायत समितींना’ भेडसावणाऱ्या विविध अडचणी, समस्या, विकासकामांसाठी आवश्यक निधी, अधिकार व स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा तसेच राज्य पातळीवर प्रभावीपणे पाठपुरावा करून, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीस नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास काळे, उपाध्यक्ष युवराज काकडे, सचिव किरण तावरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), शिरूर सभापती स्वातीताई घावटे, मावळ सभापती सुनीताताई येवले, भोर सभापती मनीषाताई कंक, मुळशी सभापती मंदाताई शेळके, राजगड सभापती सुवर्णाताई राऊत, खेड सभापती विद्याताई मोहिते, इंदापूर सभापती हर्षवर्धन लोंढे, पुरंदर सभापती अमित झेंडे आदी उपस्थित होते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





