नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मारहाण करून मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक; ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त – जन समाचार लाइव 24

मारहाण करून मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक; ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मारहाण करून मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक; ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे, प्रतिनिधी : चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मारहाण करून मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपींना अटक करत ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दि. ९ जून २०२६ रोजी बोराटे वस्ती, लेन क्रमांक २ येथील वेलकम किराणा स्टोअर्ससमोरील रस्त्यावर फिर्यादींचे पती भारत गॅसचा सिलेंडर खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून जाणाऱ्या दोन युवक व एका युवतीचा त्यांना धक्का लागला. यावरून झालेल्या वादानंतर दुचाकीवरील दोन्ही युवकांनी फिर्यादींच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले व त्यांच्याकडील सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने घेऊन पसार झाले.

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११९(२), ११७(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान आरोपींनी वापरलेल्या दुचाकीचा क्रमांक एमएच १२ एफएस ८०९३ असल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे पोलिसांनी अनिश संदीप सावंत (वय २०, रा. प्रेमनगर, वडगावशेरी)वेदांत विजय देशमुख (वय २१, रा. वाघोली) यांना ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच हिसकावून नेलेला मोबाईल फोन असा एकूण ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील गणेश जगदाळे, रमेश मेमाणे, अमरसिंग डांगे, विकास कदम, रामदास घावटे, किरण घुटे, ज्ञानोबा लहाणे, चंद्रकांत पाटील व सशिल बेंद्रे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031