नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : सराईत अग्निशस्त्र विक्रेत्याकडून ५ गावठी पिस्टल व ७ जिवंत काडतुसे जप्त – जन समाचार लाइव 24

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : सराईत अग्निशस्त्र विक्रेत्याकडून ५ गावठी पिस्टल व ७ जिवंत काडतुसे जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : सराईत अग्निशस्त्र विक्रेत्याकडून ५ गावठी पिस्टल व ७ जिवंत काडतुसे जप्त

पुणे, प्रतिनिधी : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने सराईत अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून ५ गावठी पिस्टल आणि ७ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पर्वती, खडक आणि वाघोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद (वय २०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) याचा शोध खंडणी विरोधी पथक-२ घेत होते. दरम्यान आरोपी लातूर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक लातूर येथे रवाना करण्यात आले आणि आरोपीला ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात आले.

तपासादरम्यान आरोपी सोशल मीडियावर गावठी पिस्टलसह फोटो प्रसारित करत असल्याचे तसेच अग्निशस्त्र आणि काडतुसांच्या खरेदी-विक्रीसाठी इन्स्टाग्रामद्वारे संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुढील चौकशीत आरोपीने मध्यप्रदेशातील उमरठी गावातील अग्निशस्त्र विक्रेत्यांशी संपर्क ठेवून आपल्या ओळखीच्या व्यक्तींना तेथे पाठवून गावठी पिस्टल खरेदीसाठी मध्यस्थी केल्याचे उघड झाले. या प्रकरणात वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर येवलेवाडी पोलीस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, कानिफनाथ कारखेले, पवन भोसले, आझाद पाटील, प्रशांत शिंदे, विनोद महाजन, संजय आढारी, अनिल कुसाळकर, प्रदीप परीट, सुजित वाघमारे, गणेश खरात, नितीन मुंढे, चेतन आपटे, किरण पड्याळ, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, साहील शेख, रविंद्र रोकडे, शेखर खराडे, अमोल घावटे आणि अमोल राऊत यांनी सहभाग घेतला.

अग्निशस्त्रांची अवैध खरेदी-विक्री रोखण्यासाठी पुणे गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031