नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , धानोरीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; दोघांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त – जन समाचार लाइव 24

धानोरीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; दोघांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

धानोरीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; दोघांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : धानोरी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने धडक कारवाई करत मेफेड्रॉन (एम.डी.) व डोडा चुरा बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २१ लाख १३ हजार ७४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १५ मे २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चक्रधर निवास, लेन नं. १, सिद्धार्थनगर, जकात नाक्याजवळ, धानोरी येथे आरोपींच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित (वय ४१) व राजुसिंह सहदेवसिंह राजपुरोहित (वय ४२) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलीसांनी केलेल्या झडतीमध्ये आरोपींकडून १०२.९१ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), १०२.३८ ग्रॅम डोडा चुरा, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम व इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण २१,१३,७४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. २३२/२०२६ अन्वये एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २१(क), १७(अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले करीत आहेत.
सदर कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ व सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, योगेश कुंभार, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, शरद धांडे, अमोल सोनवणे, संदीप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, महिला पोलीस अंमलदार सुकेशिनी आंबले, सुरेखा साबळे, आरती दिवेकर व वैशाली माकडी यांनी पार पाडली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930