नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , बंडगार्डन हद्दीतील वाहन चोरी प्रकरणातील सराईत चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात – जन समाचार लाइव 24

बंडगार्डन हद्दीतील वाहन चोरी प्रकरणातील सराईत चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

बंडगार्डन हद्दीतील वाहन चोरी प्रकरणातील सराईत चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात
पुणे : बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी करून फरार झालेल्या सराईत वाहन चोराला गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची होंडा अ‍ॅक्टिव्हा मोपेड जप्त करण्यात आली आहे.
दि. ५ मे २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३चे पथक हद्दीत पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मुंकुद तारू, पोलीस अंमलदार अमित बोडरे व शुभम वागस्कर हे पथकात सहभागी होते.
दरम्यान, पोलीस अंमलदार अमित बोडरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक सराईत वाहन चोर कोथरूड परिसरातील एआरआय कंपनीजवळ, केळेवाडी टेकडी परिसरात चोरीच्या वाहनासह थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.
पोलीसांना दिलेल्या वर्णनाप्रमाणे संशयित इसम झाडाखाली थांबलेला दिसून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव युवराज दादा खंडागळे (वय २१, रा. मांगवाडा, महर्षी कॉलनी, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, सध्या रा. पर्वती पायथा, पुणे) असे सांगितले.
त्याच्याकडे असलेल्या होंडा अ‍ॅक्टिव्हा मोपेडबाबत अधिक चौकशी केली असता सदर वाहन पुणे स्टेशन परिसरातून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. वाहनाचा क्रमांक एमएच १२ झेडएच ९९७७ असा असून, तपासादरम्यान सदर वाहनाबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६, बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच आरोपीवर यापूर्वी अकलूज पोलीस स्टेशन येथे वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ शैलेश संखे आणि पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930