नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , यवत येथे ‘संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा – २०२६’ उत्साहात संपन्न – जन समाचार लाइव 24

यवत येथे ‘संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा – २०२६’ उत्साहात संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

यवत येथे ‘संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा – २०२६’ उत्साहात संपन्न
मूक नायक मैत्री संघ आणि दि पिपल्स वेलफेयर अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३ एप्रिल १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘बहिष्कृत भारत’ पाक्षिकाच्या ९९ व्या वर्षपूर्ती शताब्दी निमित्त तसेच संघ नायक न्यूजच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा – २०२६’ नुकताच उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात उरुळी कांचन येथील साने संगीत लोक कलामंचचे संस्थापक शिवराज ज्ञानोबा साने यांना ‘संघ नायक पुरस्कार – २०२६’ आदर्श कला शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते साने यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून ज्येष्ठ पत्रकार एम. जी. शेलार, वीर गोविंद गोपाळ महार यांचे वंशज पांडुरंग गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गुलाब चौधरी, पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री अमोल भोसले, तसेच आबासाहेब चव्हाण, संदीप बडेकर, बाबासाहेब बेडेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक पत्रकार सदाशिव कांबळे यांनी केले. त्यांनी संघ नायकच्या स्थापनेमागील उद्देश, सामाजिक कार्य आणि पुढील वाटचाल याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार अनिल गायकवाड यांनी केले.
पुरस्कार स्वीकारताना शिवराज साने यांनी सांगितले की, “आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन ‘संघ नायक पुरस्कार – २०२६’ आदर्श कला संगीत शिक्षक म्हणून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या यशामागे माझे आई-वडील, गुरुजन आणि असंख्य मित्रमंडळी यांचे मोलाचे योगदान आहे.”
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031