नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. तुटलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका शेळीचा मृत्यू झाला, तर १६ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला. – जन समाचार लाइव 24

महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. तुटलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका शेळीचा मृत्यू झाला, तर १६ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला.

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाडेगाव ता. हवेली जिल्हा पुणे येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. तुटलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका शेळीचा मृत्यू झाला, तर १६ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाडेगाव येथील इंगळे मळा परिसरात शेतजमिनीवरून गेलेल्या तुटलेल्या विजेच्या तारेमुळे रविवारी सकाळी गंभीर अपघात घडला. शेतकरी जालिंदर इंगळे यांची एक शेळी विजेचा धक्का लागून जागीच मृत्युमुखी पडली, तर शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या १६ वर्षीय मुलगा ऋषिकेश इंगळे यालाही विजेचा धक्का बसला. मात्र, प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.
स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, ही विजेची तार गेल्या वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत खाली लोंबत होती. याबाबत अनेकदा संबंधित वायरमनला माहिती देऊनही दुरुस्ती करण्यात आली नाही. काही महिन्यांपूर्वी रोहित्र जळाल्यानंतरही ही तुटलेली तार दाखवून देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य कुशल नाना सातव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यापूर्वीच १२ मे रोजी त्यांनी महावितरणकडे लेखी तक्रार करून तुटलेल्या तारा, रोहित्र आणि फ्युज बॉक्सची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, दुर्लक्ष झाल्याने आजचा अपघात घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि वायरमनवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वाईकर यांनी “वायरमन ची चौकशी करून योग्य ती कारवाई करू,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

वाडेगाव परिसरातील या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तुटलेल्या विजेच्या तारा आणि धोकादायक विद्युत यंत्रणांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930