नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणी काळभोर महाविद्यालयात अंमली पदार्थ, महिला सुरक्षा व सायबर सुरक्षेवर जनजागृती – जन समाचार लाइव 24

लोणी काळभोर महाविद्यालयात अंमली पदार्थ, महिला सुरक्षा व सायबर सुरक्षेवर जनजागृती

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोर महाविद्यालयात अंमली पदार्थ, महिला सुरक्षा व सायबर सुरक्षेवर जनजागृती

लोणी काळभोर, दि. २१ जुलै २०२६ : युवकांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय, लोणी काळभोर येथे अंमली पदार्थ विरोधी, महिला सुरक्षा व सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित महाविद्यालयात सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत झालेल्या कार्यक्रमात इयत्ता ११ वी व १२ वीच्या सुमारे ९० ते १०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व, महिला सुरक्षा, तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय, संशयास्पद लिंक व संदेशांपासून सावध राहणे, तसेच सायबर गुन्हा घडल्यास त्वरित तक्रार कशी करावी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

हा कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मेहेर व महिला पोलीस अंमलदार थोरात (सायबर विभाग) यांनी आयोजित केला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य घोडके सर, प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले.

युवक-युवतींमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने असे जनजागृती उपक्रम भविष्यातही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे लोणी काळभोर पोलीस स्टेशनतर्फे सांगण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930