नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , हवेली पंचायत समितीकडून, स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्ताने ‘अजित वनराई’ उपक्रमांतर्गत ५०० नारळांचे वृक्षारोपण. – जन समाचार लाइव 24

हवेली पंचायत समितीकडून, स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्ताने ‘अजित वनराई’ उपक्रमांतर्गत ५०० नारळांचे वृक्षारोपण.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

हवेली पंचायत समितीकडून, स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्ताने ‘अजित वनराई’ उपक्रमांतर्गत ५०० नारळांचे वृक्षारोपण.

आळंदी म्हातोबा (ता. हवेली): महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्ताने, हवेली तालुक्यात विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन, हवेली पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले. मौजे आळंदी म्हातोबा येथे ‘अजित वनराई’ या उपक्रमांतर्गत ५०० नारळाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच हवेली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये व परिसरात प्रतिमा पूजन व ‘अजितवृक्षासह’ वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री. ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुरेशराव घुले प्रमुख पाहुणे होते. यावेळी पंचायत समिती हवेलीचे सभापती श्री. युवराज हिरामण काकडे, उपसभापती सौ. विद्या दत्तात्रय गायकवाड, गटविकास अधिकारी श्री. शेखरजी शेलार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर, जि.प.सदस्य कोमलताई संदेश आव्हाळे, सुरेखाताई रमेशबापू हरगुडे, शितलताई सुजित कांबळे, पं.स.सदस्य कृषिराज दत्तात्रय चौधरी, कोमलताई गणेश कांबळे, सुषमाताई संतोष मुरकुटे, नंदू पाटील काळभोर, गुलाब चौधरी, दिलीप गाडे यांच्यासह पंचायत समिती हवेलीचे अधिकारी-पदाधिकारी, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, आळंदीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच श्री म्हातोबा जोगेश्वरी कृती समितीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपणासारखे पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यातही हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून हरित परिसर निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. हवेली तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात प्रतिमा पूजन व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडून, यानिमित्ताने संपूर्ण हवेली तालुक्याला पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला गेल्याचे, सभापती युवराज काकडे यांनी सांगितले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031