नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शिरूर–हवेली मतदारसंघासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर : ग्रामीण- शहरी रस्त्यांना नवी उभारी – जन समाचार लाइव 24

शिरूर–हवेली मतदारसंघासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर : ग्रामीण- शहरी रस्त्यांना नवी उभारी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शिरूर–हवेली मतदारसंघासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर : ग्रामीण- शहरी रस्त्यांना नवी उभारी

शिरूर (पुणे) – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिरूर व हवेली विधानसभा मतदारसंघासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आमदार माऊली आबा कटके यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे विविध ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शिरूर व हवेली तालुक्यातील अनेक प्रमुख मार्गांचे मजबुतीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण तसेच काँक्रीटीकरण करण्यात येणार असून ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. शिरूर–निमोणे–गुणाट–कुरुळी–वडगाव रासाई–मांडवगण फराटा (रा.म. ९) या प्रजिमा ५३ मार्गाच्या सुधारणा कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मलठण–ढोकसांगवी–कोरेगावकडे जाणाऱ्या निमोणे मार्गाच्या (प्रजिमा ११४) किमी दरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार आहेत.

याशिवाय मिरवडी–दहिटणे–राहू–वाळकी संगम ते रांजणगाव सांडस–नागरगाव–कुरळी (प्रजिमा ११३) या मार्गावरील रस्त्याचे किमी दरम्यान रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच आरणगाव–आलेगाव मार्गावरील वडगाव रासाई–सादलगाव–मांडवगण फराटा–गणेगाव तांदळी (प्रजिमा ४०) या रस्त्याच्या कामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर न्हावरे–चिंचणी (प्रजिमा ५९) या मार्गावरील रस्त्याच्या किमी दरम्यान मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. तसेच शिरूर–निमोणे–निर्वी–कुरुळी–वडगाव रासाई–मांडवगण फराटा (प्रजिमा ५३) या परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार आहेत.

दरम्यान, हवेली तालुक्यातीलही काही महत्त्वाच्या रस्त्यांना या निधीतून चालना मिळणार आहे. वाघोली–भावडी–तुळापूर (प्रजिमा १६६) या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच कोरेगाव–भिवरी–वाडेबोल्हाई–डोंगरगाव–पेरणे फाटा–वढू बुद्रुक ते वढू खुर्द (प्रजिमा १९ / प्रजिमा २२६) या मार्गावरील रस्त्याचे मजबुतीकरण, सुधारणा व रुंदीकरण करण्यासाठीही शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.

या विविध रस्त्यांच्या कामांमुळे शिरूर व हवेली तालुक्यातील गावांमधील दळणवळण अधिक सुकर होणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्राशी जोडणी अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार माऊली आबा कटके यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आगामी काळात या कामांना गती मिळाल्यास ग्रामीण विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930