संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
थेऊर : फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी निमित्त श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी झाली होती. संकष्ट चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
पहाटे पुजारी राजेंद्र आगलावे यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा संपन्न झाली. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देवस्थान तर्फे मंदिर परिसरात मांडव उभारण्यात आला होता. दर्शनासाठी दर्शनबारीची तसेच पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. वाढत्या उष्णतेमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर परिसरात कूलरचीही व्यवस्था करण्यात आली होती.
दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटप करण्यात आले. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळाच्या साथीने ह.भ.प. ओंकार महाराज सावंत (बीड) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. चंद्रोदयानंतर श्रींचा पारंपरिक छबिना काढण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला.
भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ग्रामपंचायतीतर्फे भाविकांसाठी पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





