नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , उरुळी कांचनमध्ये साने संगीत क्लासेसचा गंधर्व परीक्षेत ९८% निकाल; गुणवंतांचा गौरव – जन समाचार लाइव 24

उरुळी कांचनमध्ये साने संगीत क्लासेसचा गंधर्व परीक्षेत ९८% निकाल; गुणवंतांचा गौरव

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

उरुळी कांचनमध्ये साने संगीत क्लासेसचा गंधर्व परीक्षेत ९८% निकाल; गुणवंतांचा गौरव
उरुळी कांचन (ता. हवेली): भारतीय गंधर्व संगीत महाविद्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या डिसेंबर २०२५ च्या गंधर्व संगीत परीक्षेत उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसने ९८% इतका उल्लेखनीय निकाल मिळवला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ काल दुपारी उरुळी कांचन येथे उत्साहात पार पडला.
या यशामागे क्लासेसचे प्रमुख व सर्व वाद्यांमध्ये पारंगत असलेले शिवराज साने यांचे मार्गदर्शन व अथक परिश्रम मोलाचे ठरले. साने संगीत क्लासेसमध्ये नियमित शिक्षणाबरोबरच वार्षिक सहल, स्नेहसंमेलन, समाजप्रबोधन, जनजागृती पथनाट्ये तसेच आकाशवाणी व दूरदर्शनवरील सहभाग असे विविध उपक्रम राबविले जातात.
गुणगौरव समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार सहदेव खंडागळे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. डॉ. रविंद्र भोळे, कवी व इतिहास संशोधक खलील शेख, पत्रकार सौ. सुवर्णाताई कांचन, सोरतापवाडी गावाचे उद्योजक व पत्रकार बापूसाहेब चौधरी उपस्थित होते. तसेच श्री अमोल भोसले, श्री तुपे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी संस्कृती अंधारे, वैष्णवी साळुंखे, रणक खरात, वेदांत गायकवाड, संकेत खंडागळे, श्रेयस गायकवाड, रुद्र जाधव, आरोही साळुंखे, यशराज साळुंखे, ऋतुजा आवळे, रियान गाडीलकर, सुयश घनवट, ओमकार कुंजीर, श्रेयस माने, समर्थ मुंडे आदी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोहिदास बिचकुले यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार अमोल भोसले यांनी मानले. या यशाबद्दल परिसरातून साने संगीत क्लासेसवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930