नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , एमआयटी विद्यापीठात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन – जन समाचार लाइव 24

एमआयटी विद्यापीठात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

एमआयटी विद्यापीठात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोणी काळभोर पोलिसांकडून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे आणि सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत जनजागृती

लोणी काळभोर : युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवून त्यांच्यामध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने एमआयटी (एडीटी) विद्यापीठ, लोणी काळभोर, पुणे येथे ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या उपक्रमांतर्गत विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला लोणी काळभोर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त तसेच लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, एनडीपीएस कायदा (NDPS Act), सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेदरम्यान अंमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम, सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम तसेच भविष्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीवर होणारे नकारात्मक परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करताना व्यसनाधीनतेपासून स्वतःचे आणि मित्रपरिवाराचे संरक्षण करण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

याशिवाय, वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि इंटरनेटवरील संभाव्य धोक्यांबाबत जागरूक करण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२ आणि ऑनलाइन आर्थिक सायबर फसवणुकीच्या तक्रारींसाठी सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० यांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सोशल मीडियाचा अतिवापर, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि काही प्रसंगी घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबतही विद्यार्थ्यांना सतर्क करण्यात आले. डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा, कोणत्याही संशयास्पद ऑनलाइन व्यवहारांपासून सावध राहावे आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांविरोधात शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे सचिव, प्राध्यापक आणि सुमारे १५० ते २०० विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

युवकांमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031