कदमवाकवस्तीत प्रतिबंधित पान मसाल्यावर पोलिसांची धडक कारवाई घरातून १ लाख ३३ हजारांचा विमल पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
कदमवाकवस्तीत प्रतिबंधित पान मसाल्यावर पोलिसांची धडक कारवाई
घरातून १ लाख ३३ हजारांचा विमल पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त
कदमवाकवस्ती | प्रतिनिधी : शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला व तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवणाऱ्यावर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली आहे. कदमवाकवस्ती येथील घोरपडेवस्ती परिसरातील गायकवाड कॉम्प्लेक्समध्ये ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या कारवाईत १ लाख ३३ हजार १०० रुपये किमतीचा विमल पान मसाला तसेच पान मसाल्यासाठी वापरण्यात येणारी तंबाखू/जर्दा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी रुपेश आत्माराम गायकवाड (वय ३३) याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाने प्रतिबंधित केलेला माल घरात विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
पोलीस शिपाई अशोक भागवत गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७४/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कलम २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
आरोपीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाईची नोंद ई-साक्षमध्ये करण्यात आली असून, फॉरेन्सिक पथकाला कळविण्यात आले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तैबुद्दीन मुंडे यांच्या नोंदणीअंतर्गत ही कारवाई झाली असून, सपोनि बोराटे पुढील तपास करीत आहेत.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





