नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , PMPML कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे तेजस पालकांच्या स्वाधीन – जन समाचार लाइव 24

PMPML कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे तेजस पालकांच्या स्वाधीन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

PMPML कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे तेजस पालकांच्या स्वाधीन

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमधून प्रवास करत असताना १० वर्षीय तेजस पुंडलिक खराटे हा मुलगा आपल्या आई-वडील व नातेवाईकांसोबत होता. संबंधित प्रवासी चिंचवडच्या बसमध्ये प्रवास करीत होते. मात्र, प्रवासादरम्यान जाण्याचा निर्णय बदलल्याने कर्वेनगर येथे आई-वडील व नातेवाईक बसमधून उतरले. प्रवाशांची गर्दी आणि घाईगडबडीत त्यांच्या नजरचुकीने तेजस हा बसमध्येच राहून गेला.

मुलगा बसमध्ये राहिल्याची बाब लक्षात आल्यानंतर वाहक श्री. गणेश रांगडे (वाहक क्र. २९९८), चालक तसेच तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मुलाचा शोध सुरू केला. वनदेवी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ तेजस रडत असताना कर्मचाऱ्यांना आढळून आला. कर्मचाऱ्यांनी त्याला धीर देत सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी कर्वेनगर पोलीस चौकीत नेले.

तेथे PSI नायकवाडे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर तेजसची ओळख पटवून त्याचे वडील श्री. पुंडलिक खराटे आणि आई सौ. सीमा पुंडलिक खराटे यांच्या ताब्यात त्याला सुखरूपपणे देण्यात आले.

या संपूर्ण घटनेत PMPMLच्या वाहक, चालक आणि तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, सतर्कता आणि माणुसकी विशेष कौतुकास्पद ठरली. मुलगा पालकांपासून दूर गेल्याचे लक्षात येताच कोणताही विलंब न करता त्याचा शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

या संवेदनशील व कौतुकास्पद कामगिरीबद्दल कोथरूड आगाराचे व्यवस्थापक श्री. सचिन वाबळे यांनी वाहक श्री. गणेश रांगडे आणि क्लार्क श्री. नितीन सुरेश पगारे यांचे विशेष कौतुक केले.

PMPMLची सेवा ही केवळ प्रवासी वाहतूक नसून जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपण्याचे माध्यम आहे, याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली आहे. PMPMLच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निश्चितच अनुकरणीय आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31