नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , महिला बचतगटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची ऑनलाइन बाजारपेठ; ‘अजितदादा उद्योगिनी ॲप’चे लवकरच लोकार्पण – जन समाचार लाइव 24

महिला बचतगटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची ऑनलाइन बाजारपेठ; ‘अजितदादा उद्योगिनी ॲप’चे लवकरच लोकार्पण

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

महिला बचतगटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची ऑनलाइन बाजारपेठ; ‘अजितदादा उद्योगिनी ॲप’चे लवकरच लोकार्पण

पुणे : महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना व्यापक आणि कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ‘अजितदादा उद्योगिनी ॲप’ विकसित करण्यात आले आहे. या ॲपचे अधिकृत लोकार्पण लवकरच करण्यात येणार असून, त्यासाठीच्या पूर्वतयारीला वेग आला आहे.

लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाबाबत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे व उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत ॲपच्या लोकार्पण कार्यक्रमाचे नियोजन, महिला बचतगटांमध्ये ॲपच्या वापराबाबत जनजागृती व प्रचार-प्रसार तसेच ॲपच्या तांत्रिक बाबींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महिला बचतगटांच्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेबरोबरच ऑनलाइन माध्यमातून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढविणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हे ॲप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समिती सभापती श्रीमती दिपाली हुलावळे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती अंकिता पाटील, समाज कल्याण समिती सभापती श्री. जितेंद्र बडेकर यांच्यासह जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

महिला बचतगटांच्या उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उद्योगांना नवी दिशा आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31