कॅम्प परिसरातील घरफोडी उघड; दोन आरोपी अटकेत, २.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
कॅम्प परिसरातील घरफोडी उघड; दोन आरोपी अटकेत, २.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : कॅम्प येथील एम. जी. रोडवरील कपड्यांच्या दुकानात घरफोडी करून १ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरणाऱ्या दोन आरोपींना लष्कर पोलिसांनी अवघ्या एका दिवसात अटक केली. आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकींसह एकूण २ लाख ८५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(४), ३३१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. जी. रोड, कॅम्प येथील ‘इंटस्टाईल मेन्स अॅण्ड किड्स’ या कपड्यांच्या दुकानाचे मालक ३० जून २०२६ रोजी रात्री दुकान बंद करून गेले होते. त्याच रात्री आरोपींनी दुकानाच्या खिडकीचे ग्रील उचकटून आत प्रवेश केला आणि कॅश काउंटरमधील १ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
या गुन्ह्याचा तपास करताना लष्कर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अभिषेक रामकुमार (वय १९) आणि सचिन प्रताप परिहार (वय २०) यांचा शोध घेऊन १ जुलै २०२६ रोजी अटक केली.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून १ लाख ६५ हजार १०० रुपयांची रोकड तसेच १ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण २ लाख ८५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता शिंदे अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





