दहा दिवसीय निवासी श्रामणेर बौद्धाचार्य शिबिराचा सांगता समारंभ उत्साहात
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
दहा दिवसीय निवासी श्रामणेर बौद्धाचार्य शिबिराचा सांगता समारंभ उत्साहात
प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा, पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत तालुका हवेली पूर्व व ग्राम शाखा कोरेगाव मूळ यांच्या संयुक्त विद्यमाने नालंदा बुद्ध विहार, कोरेगाव मूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय निवासी श्रामणेर बौद्धाचार्य शिबिराचा सांगता समारंभ शनिवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
दि. २१ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या निवासी शिबिरामध्ये बौद्ध धम्माचे संस्कार, नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि धम्मविषयक ज्ञान यांचे प्रशिक्षण शिबिरार्थींना देण्यात आले.
समारोप कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष बी. जी. घाटे गुरुजी, सरचिटणीस संतोष आरवडे गुरुजी, संस्कार सचिव चंद्रकांत गायकवाड, पर्यटन उपाध्यक्ष वामन वाघमारे गुरुजी, कोषाध्यक्ष रवींद्र कदम, संरक्षण उपाध्यक्ष मेजर नागसेन ओव्हाळ, संरक्षण सचिव सखाराम ओव्हाळ, परमेश्वर कदम, ऑडिटर के. डी. पवार यांच्यासह हवेली तालुका पूर्वचे अध्यक्ष विजय गायकवाड, सरचिटणीस सिद्धार्थ गायकवाड, कोषाध्यक्ष विशाल गायकवाड, संघटक निकेश मेश्राम, जितेंद्र वाघमारे, जितेंद्र पवार, सोमनाथ साळवे, ग्राम शाखा कोरेगाव मूळचे अध्यक्ष सागर शिंदे, तालुका हवेली संस्कार उपाध्यक्ष सुनील यादव, ग्राम शाखा पेरणेचे कोमलदास वासनिक, बाबासाहेब कांबळे, नीलिमाताई कांबळे, प्रज्ञाताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी धम्मगुरू भंते महाथेरो नाग घोष यांनी उपस्थितांना धम्मदेशना देत भगवान बुद्धांच्या शिकवणीचे महत्त्व विशद केले. विविध मान्यवरांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धम्माविषयीच्या विचारांचा उल्लेख करत समाजाने बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील तत्त्वांचे आचरण करून समतामूलक आणि नैतिक समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. अध्यक्षस्थानावरून विजय गायकवाड यांनी समारोपपर मार्गदर्शन केले. विशाल गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूक्त पठणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या शिबिरामुळे सहभागी शिबिरार्थींमध्ये बौद्ध धम्माबाबत जागरूकता वाढून नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





