नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सराईत घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद; चंदननगर पोलिसांकडून ३ गुन्ह्यांची उकल – जन समाचार लाइव 24

सराईत घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद; चंदननगर पोलिसांकडून ३ गुन्ह्यांची उकल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

सराईत घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद; चंदननगर पोलिसांकडून ३ गुन्ह्यांची उकल
पुणे : चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. रफिक हुसेन शेख (वय ३२, रा. चिंतामणीनगर, गल्ली नं. ३, सय्यदनगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हे रजिस्टर क्रमांक ४७१/२०२५ तसेच १६९/२०२६ आणि १७०/२०२६ या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना तपास पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील चौकांमधील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. या तपासादरम्यान तिन्ही गुन्ह्यांमधील आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत हडपसर परिसरात सापळा रचला. दिनांक १२ मे २०२६ रोजी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतून रफिक हुसेन शेख याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने तिन्ही घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७१/२०२५ या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
घरफोडीचे गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी आरोपीकडून जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-७ सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त खराडी विभाग नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, विकास बाबर, महेश लामखेडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके तसेच पोलीस अंमलदार मेमाणे, डांगे, मुलाणी, घुटे, कदम, पाटील, लहाणे आणि बेंद्रे यांनी सहभाग घेतला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031