नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , आर्थिक फसवणूक प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार आरोपी नवी मुंबईतून जेरबंद – जन समाचार लाइव 24

आर्थिक फसवणूक प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार आरोपी नवी मुंबईतून जेरबंद

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आर्थिक फसवणूक प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार आरोपी नवी मुंबईतून जेरबंद
पुणे : आर्थिक फसवणूक करून तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला चंदननगर पोलिसांनी नवी मुंबईतील सानपाडा येथून अटक केली आहे. दत्तात्रय बबन तावरे (वय ३७, रा. कोल्हेवाडी, ता. कराड, जि. सातारा, सध्या तुकारामनगर, खराडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय तावरे याने फिर्यादी यांच्याशी ओळख वाढवून पोल्ट्री व्यवसायासाठी ५० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर विश्वास संपादन करून फिर्यादींच्या पत्नीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण दोन दिवसांसाठी कार्यक्रमाचे कारण सांगून घेतले. मात्र, आरोपीने ते दागिने परस्पर मणप्पुरम गोल्ड लोनच्या चंदननगर शाखेत गहाण ठेवून त्यावर १ लाख २९ हजार ५०० रुपयांचे कर्ज घेत आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपीने आणखी तीन जणांची देखील अशाच पद्धतीने आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने आपले वास्तव्य वारंवार बदलले होते. तसेच मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांचा वापरही बंद केला होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे व पोलीस अंमलदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा सानपाडा, नवी मुंबई येथे असल्याची माहिती मिळवली.
यानंतर सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे व पोलीस अंमलदार विक्रम गायकवाड यांनी नवी मुंबई येथे जाऊन स्थानिक परिसरात शोधमोहीम राबवली. गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीला सानपाडा गावठाण परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-७ सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त खराडी विभाग नूतन पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार किरण घुटे व विक्रम गायकवाड यांनी केली

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930