नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने संगीतकार शिवराज साने सर गौरविण्यात – जन समाचार लाइव 24

पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने संगीतकार शिवराज साने सर गौरविण्यात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने संगीतकार शिवराज साने सर गौरविण्यात
पुणे : ऊरूळी कांचन येथील डॉ. मनीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २७ एप्रिल २०२६ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी संगीत व कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल संगीतकार शिवराज साने सर यांना “पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गेल्या २० वर्षांपासून शिवराज साने सर यांनी ऊरूळी कांचन व परिसरात संगीत शिक्षणाची अखंड सेवा सुरू ठेवली आहे. साने संगीत क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी नाममात्र शुल्कात विद्यार्थ्यांना संगीत शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले असून सामाजिक, सांस्कृतिक तसेच महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
साने संगीत क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आकाशवाणी रेडिओ केंद्रावरही उत्कृष्ट सादरीकरण करून आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ट संगीतकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम पुण्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, टिंबर मार्केट येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग मंत्री ना. रविंद्र साठे, राष्ट्रपती पदक विजेत्या पी.एस.आय. जयश्री पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ह.भ.प. डॉ. रविंद्र भोळे (हिंदू रत्न पुरस्कार विजेते), प्रमुख राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साळवे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नार्मन नार्टन सर यांनी केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031