नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सेवा हक्क दिनी पुणे महापालिका आयुक्तांचा राज्यस्तरीय सन्मान – जन समाचार लाइव 24

सेवा हक्क दिनी पुणे महापालिका आयुक्तांचा राज्यस्तरीय सन्मान

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

सेवा हक्क दिनी पुणे महापालिका आयुक्तांचा राज्यस्तरीय सन्मान
पुणे | दि. 28 एप्रिल 2026
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करत नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ सेवा देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे महापालिका आयुक्त मा. नवल किशोर राम यांचा “द्वितीय सेवा हक्क दिन” निमित्त राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला.
मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात पार पडलेल्या या सोहळ्यात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे प्रमुख मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. हा कार्यक्रम सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
PMC 360 उपक्रमाची राज्यस्तरावर दखल
पुणे महानगरपालिकेच्या PMC 360 या डिजिटल उपक्रमामुळे नागरिकांना अधिक गतिमान व पारदर्शक सेवा उपलब्ध होत आहेत. या अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत:
अधिकृत संकेतस्थळ व सेवा पोर्टल
तक्रार निवारण प्रणाली
DBT पोर्टल
ऑनलाईन पेमेंट सुविधा
ई-स्वाक्षरी (eSign)
QR Code प्रमाणीकरण
WhatsApp BOT
आपले सरकार पोर्टल
PMC Care इंटरफेस
नागरिकाभिमुख सेवांना गती
गेल्या वर्षभरात या सर्व प्रणाली अद्ययावत करण्यात आल्यामुळे सेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावी, सुलभ आणि नागरिकाभिमुख झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आयुक्तांच्या नेतृत्वाचे कौतुक
आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सेवा हक्क आयोगाकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.
या सन्मानामुळे पुणे महानगरपालिकेच्या डिजिटल सेवा आणि प्रशासनिक कार्यक्षमतेला राज्यस्तरावर मोठी मान्यता मिळाल्याचे मानले जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031