नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १ आरोपी व ३ विधिसंघर्षित बालक ताब्यात – जन समाचार लाइव 24

वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १ आरोपी व ३ विधिसंघर्षित बालक ताब्यात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १ आरोपी व ३ विधिसंघर्षित बालक ताब्यात
पुणे : शहरातील वाघोली परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून १ आरोपीसह ३ विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील लोणगाव रोडवरील मोरया फॅशन गल्लीत चार अज्ञात इसमांनी वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, पोलीस अमलदार नितीन धाडगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी वाघोलीतील जाधव वस्ती, भावडी रोड परिसरात आल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपींनी वाघोलीतील लोणगाव रोडवरील मोरया फॅशन गल्लीत वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिली. यानंतर त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सदर प्रकरणात वाघोली पोलीस स्टेशन गु.र. नं. २८२/२०२६ भा.दं.वि. कलम ३२४(४), ३(५) तसेच संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल प्रकाश कावरे (वय १९ वर्षे, रा. वाघोली) याला अटक करण्यात आली असून ३ विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930