नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , आळंदीत लोहार समाजाचा राज्यव्यापी लढ्याचा बिगुल; ऐतिहासिक बैठक उत्साहात संपन्न – जन समाचार लाइव 24

आळंदीत लोहार समाजाचा राज्यव्यापी लढ्याचा बिगुल; ऐतिहासिक बैठक उत्साहात संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आळंदीत लोहार समाजाचा राज्यव्यापी लढ्याचा बिगुल; ऐतिहासिक बैठक उत्साहात संपन्न
पुणे | प्रतिनिधी
लोहार समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्रभरातील विविध संघटना एकत्र आल्या. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे झालेली ही दुसरी ऐतिहासिक बैठक अभूतपूर्व प्रतिसादात पार पडली.
“राज्यस्तरीय लोहार समाज संघटना समन्वय समिती (महाराष्ट्र राज्य)” स्थापनेच्या प्रक्रियेत ही बैठक महत्त्वाची ठरली. यापूर्वी पहिली बैठक शेगाव येथे पार पडली होती. त्यानंतरच्या या बैठकीत राज्यभरातील 31 सक्रिय संघटनांनी सहभाग नोंदवत एकजुटीचा संदेश दिला.
आळंदीतील श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळेत झालेल्या या बैठकीत लोहार समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये शासन दरबारी पाठपुरावा, समाजाचे सर्वेक्षण, आरक्षणासाठीचा लढा आणि समन्वय समितीचे सशक्त गठन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले.
समन्वय समितीला आतापर्यंत 50 हून अधिक संघटनांचा सक्रिय पाठिंबा लाभला असून, राज्यातील सर्व लोहार समाज संघटनांनी या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध संघटनांनी हजेरी लावत लोहार समाजाच्या हक्कांसाठी एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
महत्वाचे मुद्दे:
राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापनेला गती
आरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी एकत्रित भूमिका
50+ संघटनांचा वाढता पाठिंबा
राज्यभर चळवळ उभारण्याचा निर्धार
लोहार समाजाच्या एकजुटीचे हे प्रदर्शन आगामी काळात राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930