नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , अजित कृषी महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन – जन समाचार लाइव 24

अजित कृषी महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊर प्रतिनिधी | अजित कृषी महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहे. भारताची ओळख जगभर कृषीप्रधान देश म्हणून आहे. आधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून शेतीत मोठे बदल होत असून शेतकरी नव्या पद्धतीने शेती करत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी जमिनीचा कस ओळखून शेती करणारा असून शेतीसोबत दुग्ध व्यवसायासारखे जोडधंदेही मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहेत. ज्या नेत्याच्या नावाने कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे, अशा प्रकारची कृषी प्रदर्शने राज्यभर राबविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत सिनेअभिनेते प्रविण तरडे यांनी व्यक्त केले.
ते थेऊर (ता. हवेली) येथे दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान आयोजित अजित कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन प्रविण तरडे यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर कटके, माजी संचालक महादेव काकडे, पांडुरंग काळे, हवेलीचे सभापती युवराज काकडे, उपसरपंच आप्पासाहेब काळे, उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, विलास कुंजीर, संतोष मुरकुटे, यशवंतचे माजी व्हाइस चेअरमन मोरेश्वर काळे तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अजित कृषी महोत्सवाचे कौतुक करत या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.
या कृषी प्रदर्शनात बदलती शेती, अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे याबाबत कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, डॉग शो यांसारखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यासोबतच पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी खिलार बैलांचा रॅम वॉक हा महाराष्ट्रातील विशेष आकर्षण असलेला आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शेतकरी बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून या कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930