संगीतकार शिवराज साने यांना ‘उत्कृष्ट संगीतकार’ पुरस्काराने सन्मान
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
संगीतकार शिवराज साने यांना ‘उत्कृष्ट संगीतकार’ पुरस्काराने सन्मान
पुणे : दैनिक साहित्य लीला पंढरी पुणे यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. रविवार, ८ मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात कवी संमेलनासह विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेस व कला मंचचे संस्थापक अध्यक्ष व संगीतकार शिवराज साने यांच्या संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेत त्यांना ‘उत्कृष्ट संगीतकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान ज्येष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे व सौ. पौर्णिमा वानखेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शनिवार पेठ, पुणे येथील ओक सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण करण्यात आले असून कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुशील सातपुते यांनी केले, तर आभार प्रदर्शन कवी रंजीत पवार (जुन्नर) यांनी केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





