नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित कडून ‘तुकाराम बीज’ निमित्त देहूगावासाठी जादा बससेवेचे नियोजन – जन समाचार लाइव 24

पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित कडून ‘तुकाराम बीज’ निमित्त देहूगावासाठी जादा बससेवेचे नियोजन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित कडून ‘तुकाराम बीज’ निमित्त देहूगावासाठी जादा बससेवेचे नियोजन
पुणे, दि. २ मार्च २०२६: संत तुकाराम महाराजांच्या ‘तुकाराम बीज’ निमित्त देहूगाव येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (PMPML) ने विशेष जादा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक ४ मार्च ते ६ मार्च २०२६ या कालावधीत विविध मार्गांवरून देहूकडे जाणाऱ्या अतिरिक्त बसेस चालविण्यात येणार आहेत.
प्रमुख मार्गांवरून जादा बसेस
स्वारगेट, मनपा भवन, निगडी, पुणे स्टेशन, भोसरी स्टेशन तसेच आळंदी आदी ठिकाणांहून देहूकडे जादा बससेवा उपलब्ध राहणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी सकाळ व दुपारच्या सत्रात विशेष फेऱ्या ठेवण्यात आल्या असून गर्दीच्या प्रमाणानुसार अतिरिक्त बसेस सोडण्याची तयारीही करण्यात आली आहे.
आळंदी–देहू दरम्यानही विशेष व्यवस्था
देहू-आळंदी या दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांसाठीही स्वतंत्र जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. वारकरी व भाविकांना त्रास होऊ नये यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक नियंत्रण ठेवले जाणार आहे.
वाहतूक व पार्किंग नियोजन
देहू येथील मुख्य मंदिर परिसरात आणि महत्त्वाच्या मार्गांवर गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. पोलिस प्रशासन व स्थानिक यंत्रणांच्या समन्वयाने बस थांबे व पार्किंग व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.
PMPML प्रशासनाने भाविकांनी जादा बससेवेचा लाभ घ्यावा व खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930