नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , श्रीक्षेत्र थेऊर येथे महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना अखेरची श्रद्धांजली. – जन समाचार लाइव 24

श्रीक्षेत्र थेऊर येथे महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना अखेरची श्रद्धांजली.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. ना. श्री. अजितदादा पवार यांचे नुकतेच झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने राज्याने एक कर्तबगार, लोकप्रिय आणि जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व गमावले आहे.
दादांच्या निधनाची बातमी समजताच श्रीक्षेत्र थेऊर येथे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या.

लाडक्या दादांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी थेऊर येथे भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वच उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्याशी असलेल्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
शोकसभेसाठी श्रीक्षेत्र थेऊर येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ व सामूहिक प्रार्थनेने करण्यात आली. सर्व उपस्थितांनी हात जोडून अजितदादा पवार यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930