नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊर–आव्हाळवाडी गटात राष्ट्रवादीचा रणशिंगनाद! प्रचार नियोजन बैठकीने फुंकला विजयाचा बिगुल – जन समाचार लाइव 24

थेऊर–आव्हाळवाडी गटात राष्ट्रवादीचा रणशिंगनाद! प्रचार नियोजन बैठकीने फुंकला विजयाचा बिगुल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊर–आव्हाळवाडी गटात राष्ट्रवादीचा रणशिंगनाद! प्रचार नियोजन बैठकीने फुंकला विजयाचा बिगुल

थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट आणि थेऊर–कुंजीरवाडी–म्हातोबाची–आळंदी पंचायत समिती गणाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराची दिशा आणि रणनिती ठरवण्यासाठी संयुक्त प्रचार नियोजन बैठक घेतली. ही महत्त्वपूर्ण बैठक रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता, कुंजीरवाडी येथील विश्व बँक्वेट हॉल (आळंदी–म्हातोबा रोड) येथे उत्साहात पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत चिन्ह व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही बैठक झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले. या भागात राष्ट्रवादीचे पारंपरिक वर्चस्व असल्याने “पक्षाचे चिन्ह म्हणजे विजयाची खात्री” असे समीकरण अनेक वर्षांपासून कायम आहे. त्यामुळे यंदा उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली होती.
अखेर पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर करत मैदान सज्ज केले आहे
कोमलताई संदेशशेठ आव्हाळे – थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट
युवराज हिरामण काकडे थेऊर–कुंजीरवाडी–म्हातोबाची–आळंदी गण
युवराज काकडे, कोमल संदेश आव्हाळे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केल्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
बैठकीला पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, वरिष्ठ नेते आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. घराघरात पोहोचणारा प्रचार, बूथनिहाय नियोजन, संघटन मजबूत करण्यावर भर देत सर्वांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. त्यामुळे ही बैठक केवळ चर्चा न राहता प्रत्यक्ष कृतीची सुरुवात ठरली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930