अवैध दारू विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर तडीपारची कारवाई
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
अवैध दारू विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर तडीपारची कारवाई
लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार
लोणी काळभोर : देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करून अवैध व्यवसाय करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर लोणी काळभोर पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. अक्षय वामन जाधव (वय २५, रा. नांदे पाटील वस्ती, सिद्राम मळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय जाधव याच्याविरुद्ध देशी-विदेशी दारूची अवैध विक्री तसेच इतर अवैध कृत्यांबाबत यापूर्वी एकूण सात गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने तसेच त्याच्या अवैध व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दारूच्या व्यसनाचे प्रमाण वाढून सामाजिक व कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.
या कारवाईअंतर्गत अक्षय जाधव याला दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून तडीपार करण्यात आले आहे.
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर व प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणाऱ्या तसेच अशा अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त गनोज पाटील, पोलीस उपआयुक्त जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे यांच्यासह पोलीस अंमलदार विलास शिंदे, प्रशांत नरसाळे, स्वाती पिसाळ, वैजीनाथ शेलार, अमोल जाधव, गणेश शिंदे, आणा गाने, सागर जगदाळे, निलेश कोल्हे, सुरज कुंभार, प्रविण दडस, राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, सागर धायतोंडे, अशोक गिरी व अशोक खरात यांनी सहभाग घेतला.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





